गावाविषयी माहिती
उधळे ही ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायतची लोकसंख्या सुमारे २०५४ ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक ६, अंगणवाडी केंद्रे ६ व व्यायामशाळा ३,सभामंडप-२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत उधळे मधील नागरिक खास जल जीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत तसेच गावच्या पूर्व बाजूला गारगाई नदीचे उगमस्थान स्थान आहे.या ठिकाणी पुरातन शिव पिंड व नदी आहे या ठिकाणाला पूर्वी नंदीचा माळ असे संबोधले जात आहे,त्या नंतर ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी शिवमंदिर बांधण्यात आले असून हे या शिवमंदिरास श्री घुटकेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे मंदीरात दर महाशिवरात्री व श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते.या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास योजनेंतर्गत मंदिराचा समावेश केला आहे.मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून जवळूनच वाहणाऱ्या गारगाई नदीमुळे मंदिर परिसर विलोभनीय दृश्य पहावयास मिळते.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून नागली, भात, वरई, उडीद व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. वरई या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
उधळे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उधळे ग्रामपंचायतीला संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ग्रामपंचायत उधळे आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.